Shri. Rajesh Omkarnath Malpani
Shri. Omkar Rajendraprasad Somani
Mrs. Jyoti Sachin Palod
१९६२-६३ साली संगमनेर व्यापारी असोसिएशनच्यामाध्यमातून संगमनेर शहरात व्यापा-यांसाठी व्यापारी वर्गाला मदत करणारी एक आर्थिक संस्था असावी या विचाराची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्याकाळी संगमनेर शहरात व्यापारी वर्गाशी संबंधीत असलेली ‘नगर अर्बन’ ही एकमेव बँक होती. परंतु या बँकेचा कारभार नगर येथून चालत असल्याने ग्राहकांची कामे होण्यास विलंब लागत असे. संगमनेर शहरात छोट्या-मोठ्या व्यापा-यांस मदत करणारी हक्काची बँक असावी या विचाराने वेग घेतला आणि १६ मे १९६६ रोजी ‘दि संगमनेर मर्चंट्स को-ऑप.बँक लि., संगमनेर’ या नावाने बँकेची स्थापना केली.
बँकेचे रजिस्ट्रेशनकरताना मर्चंट बँक या शब्दाला सरकारी पातळीवर आक्षेप घेतला गेला. सर्वांसाठी सभासदत्व खुले करा तरच परवानगी देऊ! अशी भूमिका होती. ‘ मर्चंट बँक’ या नावासाठी व्यापारी वर्ग व बँकेचे संस्थापक मंडळ यांना संघर्ष करावा लागला.
Indira Gandhi Marg New Nagar Road Sangamner,Dist Ahmadnagar - 422605
Copyright © 2020 | Design and Developed by Xposure Techmedia Pvt. Ltd