संस्थापक सदस्य

         

दि संगमनेर मर्चंट्स को-ऑप.बँक लि., संगमनेर

१९६२-६३ साली संगमनेर व्यापारी असोसिएशनच्यामाध्यमातून संगमनेर शहरात व्यापा-यांसाठी व्यापारी वर्गाला मदत करणारी एक आर्थिक संस्था असावी या विचाराची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्याकाळी संगमनेर शहरात व्यापारी वर्गाशी संबंधीत असलेली ‘नगर अर्बन’ ही एकमेव बँक होती. परंतु या बँकेचा कारभार नगर येथून चालत असल्याने ग्राहकांची कामे होण्यास विलंब लागत असे. संगमनेर शहरात छोट्या-मोठ्या व्यापा-यांस मदत करणारी हक्काची बँक असावी या विचाराने वेग घेतला आणि १६ मे १९६६ रोजी ‘दि संगमनेर मर्चंट्स को-ऑप.बँक लि., संगमनेर’ या नावाने बँकेची स्थापना केली.

बँकेचे रजिस्ट्रेशनकरताना मर्चंट बँक या शब्दाला सरकारी पातळीवर आक्षेप घेतला गेला. सर्वांसाठी सभासदत्व खुले करा तरच परवानगी देऊ! अशी भूमिका होती. ‘ मर्चंट बँक’ या नावासाठी व्यापारी वर्ग व बँकेचे संस्थापक मंडळ यांना संघर्ष करावा लागला. तत्कालिन सहकार राज्यमंत्री मा. श्री. बी. जे. खताळ पाटील यांच्या मोलाच्या सहकार्याने ‘ मर्चंट्स ‘ या नावासह  ‘दि संगमनेर मर्चंट्स को-ऑप.बँक लि., संगमनेर’ ही बँक उदयास आली.

३० ते ४५ वयोगटातील व्यापारी तरुणांनी एकत्र येऊन मर्चंट बँक निर्माण करण्याची कल्पना अस्तित्वात आणली. आज त्याची फळे आपण सर्वजण चाखत आहोत. या बँकेची नाळ सुरुवातीपासून सर्वसामान्य व्यापा-यांशी जोडली गेलेली आहे. एकूण २११ सभासद, रुपये ४४,०००/- भाग भांडवल आणि रुपये १, ७४,०००/- च्या ठेवी या छोट्याशा भांडवलावर व छोट्याश्या भाड्याच्या जागेत ५०० रुपयांचे जुने फर्निचर व तिजोरी घेऊन बँकेने कामकाजास सुरुवात केली. छोटे-मोठे उद्योजक, व्यावसायिक, नवीनव्यवसायात येणारे होतकरू तरुण, डॉक्टर्स, वाहतूक व्यावसायिक  या सर्वांनाच कर्ज वितरण करून उद्योग व्यवसाय वृद्धीसाठी बँकेने मदत केली. संगमनेर शहरातील व्यापार व उद्योगांच्या भरभराटीमध्ये मर्चंट्स बँकेचा सर्वात मोलाचा व सिंहाचा वाटा आहे; असे संगमनेर शहरातील व्यापारी व उद्योजक अभिमानाने सांगतात. विविध स्थानिक सामाजिक उपक्रमांमध्येही बँकेचा सहभाग असतो.

बँकेचे संस्थापक अध्यक्ष कै. ओंकारनाथजी मालपाणी, उपाध्यक्ष कै. बाबुशेठ मेहता, कै. रामनाथजी सोमाणी, कै, राधाकिसनजी कालडा, कै. शिवनाथजी पडतानी, कै. बन्सीलालजी पारख, कै. नरसिंगदासजी कलंत्री, कै. दगडूरामजी भंडारी, कै. रामेश्वरजी झंवर, कै. राधेशामजी अग्रवाल, या १० मान्यवरांचे सुरुवातीचे संस्थापक मंडळ होते. संगमनेर व्यापारी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष कै. पन्नालालजी लाहोटी, कै. मुरलीशेठ पोफळे, श्री. बाबुशेठ रशिदखान पठाण, कै. शिवदासजी मणियार यांचे देखील योगदान महत्वाचे होते. आज मितीला यातील कोणीही हयात नसले तरी त्यांची शिकवण व आदर्श बँकेला कायम दिशा देत राहतील.या सर्वांनाच विनम्र अभिवादन.

‘ इवलेसे रोप लावियले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी’

आज संगमनेर मर्चंट्स बँकेचे रुपांतर एका वटवृक्षात झाले आहे. कै. ओंकारनाथजी मालपाणी आणि त्यांच्या सहका-यांनी अत्यंत मेहनतीने, जिद्दीने व चिकाटीने सुरु केलेली ही बँक संगमनेर शहराची एक भरभक्कम आर्थिक नदी झाली आहे. दूरदृष्टी ठेवून स्थापन केलेली सुरुवातीला शहराबाहेर वाटणारी बँकेची मुख्य कार्यालयाची देखणी आणि भव्य वास्तू आता शहराच्या केंद्रभागी वाटते. मर्चंट बँकेच्या मागोमाग सभोवताली आलेल्या विविध बँकांमुळे हा रस्ताच बँक रोड झाला आहे. संगमनेर बाजारपेठ, अकोले, सिन्नर, राहाता, आळे, घुलेवाडी, चाकण, येथे शाखा सुरु करून बँकेने आपला कार्यविस्तार केला आहे. स्पर्धा मोठ्या प्रमाणावर वाढली असली तरी मर्चंट्स बँकेने संगमनेरची ‘आपली ‘ विश्वासाची बँक हे स्थान कायम ठेवले आहे.

नव्या पिढीतील संचालकांनी देखील तसाच जोमाने व पारदर्शक कारभार करून बँकेला प्रगतीपथावर ठेवण्यात यश संपादन केले आहे. त्याचा आलेख खालील प्रमाणे 

बँकेचे सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार, बँकेचे कर्मचारी,हितचिंतक व संगमनेर शहरातील नागरिक या सर्वांचे मनःपूर्वक सहकार्य व आशीर्वादामुळे बँकेची उत्तरोत्तर प्रगती होत राहणार आहे यात शंका नाही. या सर्वांच्या विश्वासास पात्र राहून संस्थेच्या प्रगतीसाठी बँकेचे संचालक मंडळ सदैव बांधिल राहील ; तसेच आपणाकडून उत्तरोत्तर सहकार्य मिळत राहो ही सदिच्छा!

 

मा. संचालक मंडळाच्या वतीने,

         (मा. चेअरमन)

 

 

 

Important Links

Complaints / Suggessions

Hit Counter